Monday, April 13, 2015

तेरेसा म्हणायच्या, मी माझ्या पद्धतीने धर्मांतरे घडवतेय !

भारतातल्या तथाकथित पुरोगाम्यांची आणि विवेक पिसाटांची शोकांतिका काय आहे, माहितीये? ते सातत्याने या देशातील बहुसंख्यकांच्या श्रद्धा पायदळी तुडवण्यासाठीच उभे असतात. मग सारे जगजरी त्यांच्या म्हणण्याच्या विरोधात असले तरीही चालेल, पण ही गमतीदार मंडळी हटवादीपणाने आपल्याच म्हणण्याला चिकटून राहतात. यातून त्यांचे अंतिमतः हसे होणेदेखीलठरलेलेच असते. आता परवा सरसंचालकांनी केलेल्या वक्तव्याचेच उदाहरण घ्या. 
----------------------

'मदर तेरेसा या धर्मांतरणाच्या हेतूने सेवा करायच्या', या विधानावर सारे सेक्युलर कसे तुटून पडलेलेदिसतात. त्यांच्या विधानाची सत्यासत्यता पारखण्याइतका विवेक एकतर कुणाला सुचलेला तरी नाहीये किंवा कदाचित त्यांच्या झापडबंद पुरोगामित्त्वात ते बसत तरी नसावं ! 
ते इतरांचे सोडा. स्वतः तेरेसा या धर्मांतरणाच्या मुद्यावर काय म्हणाल्या होत्या माहितीये ! तेरेसांनी १९८९ साली जगद्विख्यात 'टाईम' नियतकालिकाला एक प्रश्‍नोत्तरी (मुलाखत) दिली होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमची भारतातली सर्वात मोठी इच्छा कोणती ? आणि तेरेसा बाईंनी अवघ्या पाचच स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिले होते, टु गिव्ह जीसस टु ऑल -अर्थात 'प्रत्येकाला येशू देणे'! आहे की नाही गंमत ? 
पुढे त्या म्हणतात की, मी माझ्या पद्धतीने धर्मांतरणे घडवतेय.' 
येथे 'evangelising' असा शब्द वापरलाय. वेबस्टर शब्दकोशातत्याचा स्पष्ट अर्थ होता, 'अन्यधर्मीयास ख्रिश्‍चन करणे.' त्या पुढे असेही म्हणतात की, 'माझे सर्वच धर्मांवर प्रेम आहे, परंतु ख्रिश्‍चनिटीशी त्यांची कदापिही तुलना होऊ शकत नाही, हेवादातीत आहे. आणि माझा उद्देश हीच गोष्ट सिद्ध करण्याचा आहे. अन्यधर्मीयांपैकी कुणालाही जर शांती हवी असेल, समाधान हवे असेल; तर त्यांना येशूचा स्वीकार करावाच लागेल. हीसंपूर्ण प्रश्‍नोत्तरी 'टाईम' वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तेरेसांच्या सेवाकार्याबद्दल खूप काही बोलले जाते. पण त्या प्रत्यक्षात 'हॉस्पाईस' चालवायच्या हे किती जणांना ठाऊक आहे?' 'हॉस्पाईस'म्हणजे 'सेवागृह' याचा प्रत्यक्ष वैद्यकीय मदतीशी क्वचितच संबंध असतो. इथं केवळ रुग्णांची शुश्रुषा केली जाते, उपचार नाही. तेरेसांनी १९५३ साली कालीघाटावरील कालीमातेच्यामंदिराचे रुपांतरण करवून बनवलेले 'निर्मल हृदय' हे ख्रिश्‍चन सेवागृह याचे उत्तम उदाहरण आहे. ब्रिटीश लेखक - कवी बेंजामिन झेफॅनियाहच्या मते तेरेसांच्या सेवागृहातील कित्येक मृतव्यक्ती या केवळ जराशी वैद्यकीय मदत मिळाली असती तरी वाचू शकल्या असत्या, परंतु त्यांना तशी संधीच मिळू देण्यात आली नाही. (संदर्भ ः Benjamin Zephaniah Slams Mother Teresa, १८ ऑक्टोबर, २००९)
डॉ. रॉबिन फॉक्सयांनीही असेच मत व्यक्त केले आहे. (संदर्भ ः द लॅन्सेट, १९९४). 
तेरेसांच्या तथाकथित सेवाकार्याची सप्रमाण चिरफाड करणारे ख्रिस्तोफर हिचेन्स यांचे 'The Missionary Position : Mother Teresa in Theory & Practice' हे पुस्तक तर जगप्रसिद्धच आहे.
श्रीमती तस्लिमा नसरीन यांनी तेरेसांवर केलेली She was not in love with the poor, but the poverty -  'अर्थात 'त्या' गरीबांच्या नवे तर गरीबीच्या प्रेमात होत्या.' ही टि्‌वटद्वारे केलेली टीका (२५ फेब्रुवारी २०१५) विचारणीय वाटू लागते. 
हे मत मूळचे ख्रिस्तोफर हिचेन्स यांचे आहे. 

मजेची बाब अशी की, १९९८ सालच्या 'टाईम' मधील उपरोक्त प्रश्‍नोत्तरीमध्ये जेव्हा तेरेसांना विचारण्यात आले होते की, परमेश्वराने तुम्हाला दिलेलीसर्वात मोठी भेटवस्तू कोणती ? तेव्हा त्या उत्तरल्या होत्या, 'गरीब ! कारण त्यांच्याद्वारेच मी दिवसाचे २४ तास येशूंसोबत राहू शकते ! तेरेसा करत असलेले सेवाकार्य निरपेक्ष नव्हते, हेसरसंघचालकांचे विधान एकवार याही संदर्भात तपासून पाहणे गरजेचे आहे.
तेरेसांच्या 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' संस्थेसाठी ओळखल्या जातात, त्यांची स्थापना ही तत्कालीन पोपच्यापरवानगीनेच झाली आहे, ही बाब लक्षणीयच म्हणावी लागेल. येथे 'मिशनरी' शब्दाचा अर्थ सरळसरळ 'ख्रिस्ती धर्मप्रसारक' असाच होतो. राहिला प्रश्‍न 'चॅरिटी'चा, तर त्यातही अनेकप्रकारची संशयास्पद अनियमितता आढळते. मग ती 'हैती' चा हुकूमशहा जीन-क्लॉड दुबालिये याची १९८१ साली केलेली स्तुती असो वा ब्रिटीश प्रकाशक रॉबर्ट मॅन्सवेल यांच्याकडूनस्वीकारलेली संशयास्पद आर्थिक मदत असो ! एवढेच नव्हे, तर 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' चे वर्णन सर्वत्र 'रोमन कॅथॉलिक धार्मिक ख्रिश्‍चन संघटना' असेच केले जाते (पाहा ः Wikipedia - Missionaties of Charity) 
डॉ.फॉक्स असो वा ख्रिस्तोफर हिचेन्स, दोघेही या संघटनेत वापरल्या जाणार्‍या पद्धतीचे वर्णन 'अशास्त्रीय' असेच करतात. अरुण चटर्जींचे 'Mother Teresa : The Final Verdict'  हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात ते सांगतात की, तेरेसाचे कार्य नेहमीच वाढवून चढवून सांगण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या पैश्यांच्या भरमसाठ ओघ पाहाता, त्यांनी आपल्या संस्थेत दिलेल्या सुविधा अगदीच तुटपुंज्याआहेत.'
जानेवारी १९९२ मध्ये कॅलिफोर्नियामधील स्क्रिप्स क्लिनिक येथे तेरेसांनी एक व्याख्यान दिले होते. त्यात त्या म्हणतात, 'आम्ही मरणार्‍या प्रत्येकाला विचारतो की, तुला, तुझीसारी पापे धुऊन टाकून परमेश्‍वराप्रत घेऊन जाणारा आशीर्वाद हवा आहे का ? आणि त्या व्यक्तिने होकार दिल्यानंतर आम्ही त्या व्यक्तित बाप्तिस्मा (ख्रिस्ती पंथाची दीक्षा) देतो. ही कितीसुंदर गोष्ट आहे नाही? 
१९५२ पासून आजवर एकट्या 'निर्मल-हृदय' मध्येच जवळजवळ २९००० जणांना आम्ही अशी दीक्षा दिली आहे.' सरसंघचालकांच्या विधानाचा याहून कोणता मोठापुरावा हवा ? तेरेसा तर एकें ठिकाणी असे देखील म्हणाल्या आहेत की, 'गरीबांना वेदना होत असताना ते जणू येशूने आपल्यासाठी भोगलेल्या वेदनाच वाटून घेत असतात. ह्या वेदनांचीजगाला मदतच होणार आहे.
पुरोगामित्त्वाच्या भारतीय आवृत्तीची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आज केवळ 'सरसंघचालक' बोलले एवढ्या एकाच कारणासाठी ही मंडळी अथवा हीमंडळी तरेेसांची कड घ्यायला उभी राहिली आहेत. परंतु प्रस्तुतच्या लेखात संघाशी सुतराम संबंध नसलेल्या कित्येक अभारतीय विद्यानांची नव्हे स्वत: तेरेसांचेेदेखील भागवतांच्याचआरोपाची मते ससंदर्भ उद्धृत करण्यात आली आहे. त्याविषयी कधी ही मंडळी अथवा वाद घालण्यातच अधिक रस असलेले पत्रकार- माध्यमे कधी बोलताना आढळतात का? हा या विवेकपिसाटांचा दुटप्पीपणाच नव्हे काय? ही मंडळी हिंदू धर्मातील चमत्कारांबाबत कान टवकारतात. परंतु ख्रिस्तीपंथात संतत्व बहाल करण्यासाठी किमान एक तरी चमत्कार सिद्ध व्हावालागतो, याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. तेरेसांना संतत्व देताना २००२ साली व्हॅटिकनने त्यांचा एक चमत्कार नोंदवलाय. 
मोनिका बसरा या स्त्रीच्या पोटातील कॅन्सरची गाठ तेरेसांचे चित्र असलेले पदक गळ्यात घातल्यानंतर नाहिशी झाली, अशा अर्थाचा तो चमत्कार होता. इतरवेळी अंधश्रद्धांच्या नावाखाली श्रद्धांचे निर्मूलन करू पाहणार्‍यांनी कधी यात लक्ष घातलेय का ? बसरावर उपचार करणारे डॉ. रंजन मुस्तफी यांनी 'द न्यूयॉर्क टाईम्स' शी बोलताना सांगितलेय की, 'एकतर ती गाठ कॅन्सरची नव्हती. दुसरे म्हणजे ती काही एका रात्रीत बरी झालेली नाही. त्यामागे सुमारे वर्षभराचे वैद्यकीय उपचार आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतः बसराचे पती म्हणाले आहेत की, 'माझी पत्नी, डॉक्टरांमुळे बरी झाली, चमत्कारामुळे नव्हे. (संदर्भ ः time.com, १४ ऑक्टोबर २००२ चा What's Mother Teresa Got To Do With It लेख) मग अशा संशयास्पद चमत्काराच्या आधारे दिले गेलेले संतत्त्वदेखील संशयास्पदच ठरत नाही का ?

तेव्हा तेरेसांचे कार्य मुळातच संशयास्पद आहे, एवढे निश्‍चित. ही गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून स्थापित आहे. संघचालकांच्या विधानामुळे ती पुन्हा एकवार ढवळून वर आलीये एवढेच ! तेव्हा भगवंतानी केलेले विधान हे केवळ 'त्यांनी' केलेय म्हणून वादग्रस्त ठरण्यापेक्षा, खरे तर सत्य अधिक निरखून पाहाण्याची आवश्यकता आहे. प्रश्‍न असा आहे की, फेक्युलर माध्यमे आणि पक्षपाती पत्रजंतू हे पाहातील का?
--------------------------------
www.vikramedke.com
cell : 09881352985
हा लेख मार्च २०१५ च्या विवेक विचार मध्ये प्रकाशित झाला आहे 

No comments: