भाऊ तोरसेकर

गेली ४६ वर्षे पत्रकारिता. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथे १९६८ सालात आरंभ. पुढे अनेक दैनिके साप्ताहिके यात उपसंपादक व स्तंभलेखक म्हणुन सतत लिखाण. श्री, ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपुत्र, ह्या साप्ताहिकात व दै, सकाळ, नवशक्ती अशा दैनिकात लिखाण व पत्रकारिता. ‘आपला वार्ताहर’चे संपादक म्हणून त्याचा आरंभ. जनशक्ती, नवनगर या दैनिकांचे आरंभीचे संपादक, पुण्यनगरी दैनिकातील ‘उलट तपासणी’ या लोकप्रिय मालिकेचे स्तंभलेखक. आजवर दहा हजारापेक्षा अधिक सामाजिक राजकीय लेख प्रसिद्ध. कोरी पाटी, उठ वेड्या तोड बेड्या, मोदीच का? अशी प्रकाशित पुस्तके. सडेतोड व परखड राजकीय विश्लेषक म्हणून ओळख. गेल्या काही वर्षात सोशल मीडियातील लोकप्रिय ब्लाॅगर.
ब्लाॅग -
जागता पहारा
संकेतस्थळ : http://bhautorsekar.in/

1. भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते गोधन विशेषांकाचे प्रकाशन

No comments: