पासाडेना, कॅलिफोर्निया येथील एका भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, “प्रत्येक युगात, प्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन करा. चैतन्याची - दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होते. सर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागते. मुसलमानांच्या मनात ही धारणा विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची घोषणा हीच की, ‘अल्ला एकच आहे आणि महंमद हाच त्याचा प्रेषित आहे.’ एवढेच सत्य. यावेगळे जे जे आहे ते केवळ त्याज्यच नव्हे, तर चिरडून नष्ट करून टाकले पाहिजे. जे कोणी काफर आहेत त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेत. या उपासनापद्धतीहून वेगळ्या उपासनापद्धती तोडून मोडून फेकून दिल्या पाहिजेत. याहून वेगळे सांगणारा प्रत्येक धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे. अशी ही धर्मांधता आहे. प्रशान्त महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत या धर्मांधांनी पाचशे वर्षे रक्ताचे पाट वाहविले! इस्लाम हा असा आहे!
(समग्र वाङ्मय, खंड 4)
No comments:
Post a Comment