Tuesday, May 11, 2010

विटी-दांडू

विटी-दांडू किंवा गिल्ली-दांडू हा दोन लाकडी तुकड्यांनी खेळला जाणारा भारतीय उपखंडातील ग्रामीण तरुणांचा एक लोकप्रिय खेळ आहे. विटी किंवा गिल्ली चार इंचाचा लाकडी तुकडा असतो. याला दोन्ही बाजूने निमुळता आकार देण्यात आलेला असतो. ह्याला दांडूने मारण्यात येते. एक हातभर लांबीचा लाकडी दंडा ज्याला खेळाडू आरामात फिरवू शकतो.
गिल्ली क्रिकेटमधल्या बेल (क्रिकेट बेल्स) सारखी व दाडू क्रिकेट बॅटसारखा असतो. हा दोन्ही बाजूंनी खेळला जातो आणि त्यात काही नियम असतात. गिल्ली-दंडा खेळात खेळाडूंची संख्या किंवा संघाच्या संख्येची काही अधिकृत सीमा निश्चित केलेली नाहीये. खेळाडू आपल्या सोयीने नियम बनवू शकतात.
हा खेळ दोघातही खेळता येतो आणि दोन संघांमध्येपण खेळला जाऊ शकतो.
गिल्ली मारली गेल्यावर हवेत उडते. जर विपक्षी संघाच्या कोणी खेळाडूने गिल्लीला हवेतच झेलली, तर मारणारा (डाव घेणारा) आऊट होतो.
जर गिल्ली जमिनीवर पडली, तर गिल्लीच्या जवळच्या खेळाडूला, गिल्ली फेकून दंड्याला (जो की खड्ड्याच्या तोंडावर ठेवलेला असतो) मारायचा एक मोका मिळतो, (क्रिकेटमधल्या धावबादसारखं). जर का खेळाडू दंड्याला मारण्यात यशस्वी ठरला, तर डाव घेणारा आऊट होतो आणि जर यशस्वी नाही झाला, तर डाव घेणाऱ्याला एक पॉईंट आणि दुसऱ्यांदा मारायची संधी मिळते.
जास्त पॉईंट मिळवणारा संघ (किंवा व्यक्ती) खेळात जिंकतो. जर डाव घेणारा खेळाडू तीनवेळा प्रयत्न करूनही गिल्लीला मारण्यात यशस्वी नाही झाला तर तो आऊट होतो. हा खेळ क्रिकेटसारखा असून, बरेचशे लोक असं मानतात की क्रिकेट हा खेळ गिल्ली-दांडूवरूनच अस्तित्वात आलेला आहे.
हा खेळ विविध प्रकारे खेळता येतो.

No comments: