Tuesday, May 11, 2010

माधुरी गुप्ताचादेशद्रोह

माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा
अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का
देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस
डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत,
प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत
आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला
अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब
चिंताजनक आहे।


इस्लामाबाद (वृत्तसंस्था)- पाकिस्तानी गुप्तचर संस्था "आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली महिला राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता हिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.
माधुरी गुप्ता इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाली होती व तिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. ती शिया मुस्लिम आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
""इस्लामच्या शिकवणुकीमुळे प्रभावित झालेल्या माधुरी गुप्ता हिने इस्लाम धर्म स्वीकारला खरा; मात्र, आपली ही नवीन ओळख जाहीर करण्यास ती धजावत नव्हती. माधुरी गुप्ता हिच्या नातेवाईकांचे लखनौतील ़़ख्यातनाम मुस्लिम परिवार असलेल्या आशिक हुसेन जाफरी यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध आहेत. माधुरी गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील मोठा कालावधी लखनौतील जाफरी कुटुंबीयांसमवेत काढलेला आहे. येथेच तिला मुस्लिम मूल्यांची शिकवणूक मिळाली,'' असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलेले आहे.
रमझानच्या महिन्यात एका स्थानिक पत्रकाराने संवाद साधला असता माधुरी तेव्हा त्याला म्हणाली,""माझे उपवास सुरू आहेत. मला इस्लामविषयी प्रचंड आदर आहे.''असेही वृत्तात म्हटलेले आहे.
माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत, प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसकट इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरविणाऱ्या रॅकेटचा वेळीच पर्दाफाश झाला, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदाची म्हटली पाहिजे. पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयात काम करणाऱ्या द्वितीय सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने ही माहिती आयएसआयसारख्या संस्थेला पुरवावी, ही तशी गंभीर बाब होय. माधुरी गुप्ता नावाच्या महिला अधिकाऱ्याचे हे कृत्य म्हणजे देशाशी "गद्दारी'च होय. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने भारतात घातपाती कारवाया घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे कारस्थान करत असताना आपल्याच देशाच्या महिला अधिकाऱ्याने गोपनीय माहिती त्या देशाला पुरवावी, हा देशद्रोहही आहे.
माधुरी गुप्ता नावाच्या या महिलेने यासंदर्भात जो कबुलीजबाब दिला आहे, तो तर आणखी धक्कादायक आहे आणि भ्रष्टाचाराने कुठले टोक गाठले आहे, यंत्रणा कशा बरबटल्या आहेत, याचा परिचय देणारा आहे. परराष्ट्र सेवेअंतर्गत विदेशात काम करताना या महिलेला 70 हजार रुपये पगार असल्याची माहिती आहे. शिवाय, इतर सोई-सवलती आहेतच. असे असतानाही ही बाई म्हणते, मला पैशांची अतिशय आवश्यकता असल्याने मी ही माहिती आयएसआय व इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरवीत असे. लठ्ठ पगार आणि सोई-सवलती मिळत असतानाही या बाईला अतिरिक्त पैसा कशासाठी हवा होता आणि तो मिळविण्यासाठी तिने कोणकोणती माहिती आयएसआयला पुरविली, याचा शोध आता जरुरी आहे.
देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. लाच घेताना पकडले, अशी बातमी वर्तमानपत्रात नाही, असा दिवसच उगवेनासा झाला आहे. त्याची आता लोकांना सवयही झाली आहे. बातमी आली की, लोक ती वाचतात, त्यावर चर्चा करतात अन्‌ दुसरी बातमी आली की, पहिली विसरतात व नव्याची चर्चा करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांच्याकडे आयकर खात्याने धाड घातली असता जे घबाड मिळाले, त्याचे वृत्त वाचूनच अनेक जण चक्रावून गेले. त्यांच्याकडे अठराशे कोटी रुपये रोख आणि दीड टन सोने आढळून आले. कुठून आणला याने एवढा पैसा? सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी?) गोपनीय माहिती विकून भ्रष्टाचारच केला आहे, पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, तो देशाच्या सुरक्षेलाच धोका पोहोचविणारा आहे. पाकिस्तानसाठी चाललेली या बाईंची हेरगिरी उघड झाली नसती, तर आगामी काळात देशाला आणखी कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागले असते, किती निष्पाप लोकांना नाहक जीव गमवावा लागला असता, याची कल्पना न केलेलीच बरी.
53 वर्षे वय असलेल्या गुप्ता बाईंना उर्दू चांगले लिहिता, बोलता आणि वाचता येते म्हणून तिला पाकिस्तानात पाठविण्यात आले, तर तिने त्याचा असा दुरूपयोग केला. पकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत भारताचे जे धोरण आहे, त्याची माहिती आयएसआय व इतर पाकी यंत्रणांना पुरवून या बाईने देशाच्या सुरक्षेशीच खेळ केला आहे.
पान 23 वरुन....
गुप्ता बाईंची हेरगिरी दोन वर्षे बिनबोभाट चालली, पण आपल्या कार्यकक्षेबाहेरची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणे सुरू केले, तेव्हा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली अन्‌ बाईची हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली असती, तर समजण्यासारखी गोष्ट होती, पण बाईने आपल्या देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या देशाला पुरवून फार मोठे पाप केले आहे. पैशांची एवढीच आवश्यकता होती, तर आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना सांगून मदत मिळविता आली असती. पैशांच्या आवश्यकतेमागील कारण योग्य वाटले असते, तर सहकाऱ्यांनीही मदत केली असती. प्रसंगी सरकारकडून मदत मिळवून दिली असती, पण असे काही न करता गुप्ता बाईने एकाच वेळी भ्रष्टाचार, धर्मद्रोह अन्‌ देशद्रोह असे तीन गुन्हे केले आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुप्ता बाईला किमान दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, यात शंका नाही. या गुप्ता बाईने दिलेल्या आणखी एका माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारताची जी उच्चायुक्त कार्यालये आहेत, त्या कार्यालयांमधील काही अधिकारीही हेरगिरी करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर सरकारने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. या हेरगिरी प्रकरणाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या उच्चायुक्त कार्यालयांमधील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेऊन यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे. वास्तविक, पाकिस्तानमधील उच्चायुक्त कार्यालयात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा माधुरी गुप्ता यांना देशसेवेसाठी फायदा करून घेता आला असता. अशी संधी सर्वांना मिळत नसते. ती नशिबाने माधुरी गुप्ता यांना मिळाली. देशासाठी उत्तम कामगिरी करून नाव कमावण्याऐवजी त्यांनी स्वत:ला व देशालाही खाली मान घालायला लावणारे कृत्य केले आहे.
साभार : तरुण भारत

No comments: